मुख्य मजकुरावर जा

Benjamin

157 वचने · 26 कुटुंब सदस्य

Benjamin चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”

  2. दुसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला.

  3. या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

  4. एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”

  5. तिसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली.

  6. बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली.

  7. मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”

  8. तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

  9. तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर भरवसा होता.

  10. आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील. बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.”

  11. नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे.

  12. बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते.

  13. त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवारधारक मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते.

  14. मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले.

  15. इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.”

  16. सर्व इस्राएली लोक त्यांचा बंधू बिन्यामीन गोत्राबद्दल दुःखी झाले. ते म्हणाले, “आज इस्राएलांच्या एका गोत्राचा उच्छेद झाला आहे.

  17. मग संपूर्ण सभेने बिन्यामीन गोत्राकडे जे रिम्मोन खडकावर राहत होते, निरोप पाठवून त्यांच्याकडे शांतीची बोलणी केली.

  18. बिन्यामीन लोक त्यावेळेस परत आले आणि याबेश-गिलआद येथील उर्वरित स्त्रिया त्यांना पत्नी म्हणून देण्यात आल्या आणि मग ते आपापल्या घरी परतले. परंतु त्या त्यांना पुरेसा नव्हत्या.

  19. बिन्यामीन गोत्रासाठी लोकांनी दुःख केले, कारण याहवेहने इस्राएलांच्या गोत्रांमध्ये दरी निर्माण केली.

  20. आणि सभेतील वडिलांनी म्हटले, “बिन्यामीन स्त्रियांचा संहार केल्यामुळे जे पुरुष उरले आहेत त्यांना पत्नी कशी मिळवून द्यावी?

  21. उरलेल्या बिन्यामीन लोकांना वारस मिळालेच पाहिजे, म्हणजे इस्राएलच्या एका गोत्राचा नाश होणार नाही.

  22. आपण आपल्या कन्या त्यांना देऊ शकत नाही. कारण आपण इस्राएली लोकांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे: ‘जो कोणी बिन्यामीनास पत्नी करून देईल, तो शापित होईल.’

  23. म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना अशी सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा

  24. आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकएका तरुणीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.

  25. यासाठी बिन्यामीन लोकांनी हे केले. जेव्हा तरुण स्त्रिया नाचत होत्या, तेव्हा प्रत्येक पुरुषाने एकी एकीला धरले आणि तिला आपली पत्नी म्हणून घेऊन गेले. ते परत आपल्या वतनात आले आणि त्यांनी नगरे परत बांधली आणि ते त्यात राहू लागले.