मुख्य मजकुरावर जा

Benjamin

157 वचने · 26 कुटुंब सदस्य

Benjamin चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.

  2. एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.

  3. यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.

  4. यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले.

  5. मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे.

  6. मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो;

  7. जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.