मुख्य मजकुरावर जा

Benjamin

157 वचने · 26 कुटुंब सदस्य

Benjamin चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.

  2. बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;

  3. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  4. मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला: “याहवेहचा लाडका त्यांच्याजवळ सुरक्षित राहो, कारण दिवसभर याहवेह त्याची ढाल होऊन त्याला आपली सुरक्षा प्रदान करतात, आणि जो याहवेहला प्रिय आहे तो त्यांच्या दोन्ही खांद्यामध्ये सुरक्षित आहे.”

  5. बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार पहिली चिठ्ठी निघाली. त्यांच्या वाट्याला आलेला भाग यहूदाह आणि योसेफाच्या गोत्रातील प्रांतांच्या दरम्यान होता.

  6. पूर्वेकडील सीमा यार्देन नदी होती.

  7. बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार मिळालेली नगरे ही होती: यरीहो, बेथ-होगलाह, एमेक-केझीज,

  8. सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे.

  9. पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली.

  10. बिन्यामीनच्या गोत्राकडून त्यांना: गिबोन, गेबा,

  11. तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.

  12. ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले; बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्‍या लोकांसह होते. माखीराचे सरदारही आले, जबुलूनाचे दंडधारी सेनापतिसुद्धा आले.

  13. तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते.

  14. तेव्हा ते प्रवास करीत पुढे निघाले आणि सूर्य मावळत असता ते बिन्यामीनच्या गिबियाहजवळ पोहोचले.

  15. (बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएली लोक वर मिस्पाह येथे गेले आहेत.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”

  16. तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो.

  17. आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”

  18. मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे?

  19. गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात.

  20. बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले.

  21. बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले.

  22. बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.

  23. इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”

  24. मग इस्राएली लोक बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली.

  25. बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले.