मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्याच्या देशाला माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”

  2. परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.”

  3. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.

  4. यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.

  5. जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते;

  6. दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600;

  7. आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000;

  8. तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”

  9. परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे.

  10. परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन.

  11. राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले.

  12. याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.

  13. बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.

  14. त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले.

  15. नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.”

  16. तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!”

  17. जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही.

  18. तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.”

  19. इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.

  20. म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या.

  21. जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.

  22. रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते.

  23. अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला.

  24. अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका!

  25. तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे?