Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने

639 वचने · 45 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे.

  2. माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.

  3. ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.

  4. परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला.

  5. रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  6. अबीयाहच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले ते सर्व यहूदीया देशाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? अबीयाह व यरोबोअम यांच्यातील युद्ध सुरूच होते.

  7. यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  8. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  9. (त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)

  10. तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  11. तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस?

  12. पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

  13. पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”?

  14. “ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: तुमच्याकडे दोन हजार घोडेस्वार जरी असले तरी मी तुला दोन हजार घोडे देईन!

  15. रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?

  16. शिवाय, मी याहवेहशिवाय या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशावर हल्ला करण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ”

  17. तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

  18. परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगावयास पाठविले होते, ते काय फक्त तुमच्या धन्याला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुमच्यासारखीच स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”

  19. मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका!

  20. राजा असे म्हणतात: हिज्कीयाहस तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

  21. ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका.

  22. “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे राजा असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,

  23. जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.

  24. कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

  25. हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाहची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय?