- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Tribe Of Reuben बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.
आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”
तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.
रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,
याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.
रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.
तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला.
त्यावेळी मी तुम्हाला आज्ञा दिली: “याहवेह तुमच्या परमेश्वराने हा प्रदेश तुम्हाला वतन म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही त्यात वस्ती करण्यापूर्वी तुमच्या सक्षम योद्ध्यांना शस्त्रे धारण करून यार्देन ओलांडून इतर इस्राएलाच्या पुढे पाठवावे.
तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमची जनावरे (मला माहीत आहे तुमच्याकडे विपुल गुरे आहेत) यांना मी तुम्हाला दिलेल्या शहरात राहता येईल,
यार्देनेच्या पश्चिमेला याहवेह देत असलेल्या देशात तुमचे इस्राएली बांधव वस्ती करेपर्यंत आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्याप्रमाणे तुम्हाला विसावा दिला आहे, त्याप्रमाणे त्यांनाही विसावा मिळेपर्यंत, तुमच्या बांधवांना मदत करा. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिला आहे येथे तुम्ही आपल्या वतनावर परत यावे.”
आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
“रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो, त्याची माणसे कमी न होवोत.”
रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:
आर्णोन खोर्यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,
हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे,
याहसाह, केदेमोथ, मेफाथ,
किर्याथाईम, सिबमाह, खोर्यातील टेकडीवरील जेरेथ-नगर.
बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ.
पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.
या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.
यार्देनच्या किनार्यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.
नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले
आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे.
कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे.