मुख्य मजकुरावर जा

The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने

102 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.

  2. जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत;

  3. मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”

  4. अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”

  5. “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.

  6. तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.

  7. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.

  8. परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली.

  9. मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”

  10. तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.

  11. फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

  12. त्यांचे भय बाळगणार्‍यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते.

  13. कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.

  14. मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  15. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’

  16. तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

  17. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”

  18. यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात.

  19. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो.

  20. जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.

  21. परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे,

  22. आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले.

  23. विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,

  24. मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले.

  25. त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे.