मुख्य मजकुरावर जा

The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने

102 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले, त्यांची करुणा सनातन आहे.

  2. परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले; त्यांची करुणा सनातन आहे.

  3. ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले, त्यांची करुणा सनातन आहे.

  4. ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला, त्यांची करुणा सनातन आहे.

  5. ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले— त्यांची करुणा सनातन आहे.

  6. ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला, त्यांची करुणा सनातन आहे.

  7. आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही— त्यांची करुणा सनातन आहे.

  8. आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.

  9. ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली, त्यांची करुणा सनातन आहे.

  10. ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  11. आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  12. ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे.

  13. स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.

  14. याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.

  15. याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.

  16. जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.

  17. हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; अगे पृथ्वी, आनंदित हो; अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.

  18. “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन.

  19. क्षणिक रागाच्या भरात मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने मी तुझ्यावर करुणा करेन,” असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.

  20. माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.

  21. दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.

  22. उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही,

  23. आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.

  24. याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.

  25. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.