मुख्य मजकुरावर जा

The Mercy of God बद्दल बायबलमधील वचने

102 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्‍यांवर विपुल आहे.

  2. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.

  3. याहवेहची स्तुती असो! याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  4. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे.

  5. आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.

  6. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  7. इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  8. अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  9. याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

  10. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  11. हे याहवेह, तुमच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तुमचे नियम मला शिकवा.

  12. हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.

  13. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.

  14. देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.

  15. प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.

  16. केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे.

  17. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  18. त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.

  19. त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.

  20. दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य, त्यांची करुणा सनातन आहे.

  21. रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

  22. त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले, त्यांची करुणा सनातन आहे.

  23. त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  24. ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  25. तांबडा समुद्र दुभागला, त्यांची करुणा सनातन आहे.