Spoils बद्दल बायबलमधील वचने: Divided between the combatants and non-combatants of the Israelites, including priests and Levites
Divided between the combatants and non-combatants of the Israelites, including priests and Levites बद्दल वचने
मग याहवेह मोशेला म्हणाले,
“तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी.
लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा.
युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर.
त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे.
इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.”
म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले.
युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे,
72,000 गुरे,
61,000 गाढवे
आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता.
युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: 3,37,500 मेंढरे,
ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती;
36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती;
30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती;
16,000 लोक, ज्यापैकी याहवेहची खंडणी 32 होती.
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली.
युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला—
इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे,
36,000 गुरे,
30,500 गाढवे
आणि 16,000 लोक.
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.
नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले
आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही.