Skip to content

Sieges बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले.

  2. त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही.

  3. मग यहोशुआ आणि त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने एग्लोन सोडल्यावर ते हेब्रोनला आले आणि त्यावर हल्ला केला.

  4. त्यांनी ते शहर हस्तगत केले आणि एग्लोन येथे केल्याप्रमाणे हेब्रोनच्या राजासह प्रत्येकाचा तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहू दिली नाही.

  5. मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएली मागे वळून दबीरवर चालून गेले व त्यांच्याशी लढले.

  6. त्यांनी ते शहर, त्याचा राजा व त्यातील गावे हस्तगत केली व त्यांना तलवारीने मारून टाकले. त्यातील प्रत्येकाचा समूळ नाश केला. त्यांनी एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. आणि लिब्नाह व त्याच्या राजाला व हेब्रोनला केले तसे त्यांनी दबीर व त्याच्या राजालाही केले.

  7. तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.

  8. म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला.

  9. अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला.

  10. संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.

  11. त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.

  12. अम्मोनी नाहाशने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”

  13. परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.”

  14. याबेशचे वडीलजन त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.”

  15. दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

  16. जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.”

  17. तेव्हा दावीद आणि त्याची माणसे कईलाहकडे गेली, पलिष्ट्यांशी लढले आणि त्यांची गुरे नेली. त्याने पलिष्टी लोकांचे मोठे नुकसान केले आणि कईलाहच्या लोकांना वाचविले.

  18. तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,

  19. आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.

  20. त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.

  21. राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय?

  22. यरुब्बशेथचा पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ”

  23. त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले.

  24. नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे.

  25. तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.”