Sieges बद्दल बायबलमधील वचने: Walls of, defended by the inhabitants
Walls of, defended by the inhabitants बद्दल वचने
राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय?
यरुब्बशेथचा पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ”
तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”
तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.