Skip to content

Rabbah

14 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Rabbath

31.9500, 35.9200 गूगल नकाशावर पाहा

Rabbah चा उल्लेख असलेली वचने

  1. (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)

  2. गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

  3. किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.

  4. त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.

  5. त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले.

  6. नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे.

  7. त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले.

  8. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  9. त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला.

  10. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  11. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  12. अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव.

  13. मी राब्बाह नगराला उंटांचा तबेला व अम्मोनला मेंढरांचे विश्रामस्थान असे करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  14. म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा तसा भयानक रणगर्जना होतील;