Skip to content

Sieges बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले.

  2. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.

  3. तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला.

  4. अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला.

  5. त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले,

  6. “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ”

  7. तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?” यहोशाफाटने इस्राएलच्या राजाला उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत, जसे माझे घोडे तसेच ते तुमचेही घोडे आहेत.”

  8. यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.

  9. मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.

  10. काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.

  11. एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्‍या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!”

  12. राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

  13. मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’

  14. तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्‍या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.”

  15. इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.

  16. आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.

  17. हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली

  18. त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले.

  19. तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस?

  20. तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

  21. अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या आणि तेथील पाणी प्यालो. माझ्या पावलाच्या तळव्याने मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’ ”

  22. “म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “ ‘तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.

  23. त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

  24. आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.

  25. म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.