Skip to content

Sieges बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.

  2. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.

  3. हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी.

  4. तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.

  5. त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”

  6. नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.

  7. त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले:

  8. “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे.

  9. त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.

  10. तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.

  11. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.

  12. चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे.

  13. सीयोनकन्येला द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे.

  14. तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते.

  15. यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.

  16. या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील.

  17. “पाहा, वेढा घालणार्‍यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता.

  18. कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात.

  19. या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या! तिची धान्यांची कोठारे फोडा; तिच्या भिंती पाडा, धान्याच्या राशी सारखा तिचा ढिगारा करा. आणि तिचा समूळ नायनाट करा तिच्यातील कोणीही शिल्लक ठेवू नका.

  20. तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.

  21. म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.

  22. त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; तिच्या विनाशाच्या दिवशी ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील.

  23. बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.

  24. नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.

  25. जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन.