Skip to content

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”

  2. एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव.

  3. कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ”

  4. ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे.

  5. एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

  6. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  7. अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”

  8. अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्‍यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको.

  9. आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”

  10. तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली.

  11. जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.” पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले.

  12. ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”

  13. नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.

  14. आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.

  15. एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

  16. ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.

  17. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.

  18. त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”

  19. इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”

  20. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  21. तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला.

  22. अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.”

  23. परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.

  24. दिमिष्कमधील अमानाह व परपर या नद्या इस्राएलातील जलांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यामध्ये स्नान करून मी स्वतःला शुद्ध करू शकतो की नाही?” मग तो मागे फिरला आणि क्रोधाने निघून केला.

  25. नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”