मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्‍या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.”

  2. नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.

  3. सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.”

  4. तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.

  5. दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.

  6. पहारेकर्‍याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता.

  7. तेव्हा पहारेकर्‍याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.”

  8. पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,” राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.”

  9. तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्‍यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”

  10. राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?” अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.”

  11. राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला.

  12. नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”

  13. राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?” त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.”

  14. तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”

  15. गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”

  16. तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले:

  17. “येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा.

  18. त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.”

  19. म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला.

  20. सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.

  21. काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता.

  22. मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले:

  23. “सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.”

  24. तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, “एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?”

  25. ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.”