मुख्य मजकुरावर जा

Seeking God बद्दल बायबलमधील वचने

88 वचने · 64 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?

  2. परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.

  3. रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.

  4. जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.

  5. याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.

  6. मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.

  7. याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.

  8. दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात; माझे मार्ग जाणून घेण्याचा कसून प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करतात, जणू काही ते राष्ट्र सर्वकाही यथायोग्य करते आणि त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी फेटाळल्या नाहीत. ते मला रास्त निर्णय मागतात आणि परमेश्वराने त्यांच्या निकट यावे म्हणून आतुर आहेत असे दर्शवितात.

  9. तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.”

  10. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.

  11. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  12. याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता,

  13. ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”

  14. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  15. याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.

  16. याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; आणि त्याला भस्म करून टाकील, आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.

  17. तेव्हा मी यहूदीयातील आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्‍यांच्या नावाचा—

  18. जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,

  19. जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”

  20. या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.

  21. “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.

  22. “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  23. परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  24. “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.

  25. देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.”