मुख्य मजकुरावर जा

Seeking God बद्दल बायबलमधील वचने

88 वचने · 64 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले.

  2. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?

  3. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.

  4. परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  5. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?

  6. समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.

  7. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”

  8. हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.

  9. “ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? नक्कीच नाही.

  10. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.

  11. विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व पाया बांधून घडविलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता.

  12. पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे.

  13. आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही.