Skip to content

Seeking God बद्दल बायबलमधील वचने

88 वचने · 64 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.

  2. उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;

  3. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

  4. आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.”

  5. “म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल.

  6. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  7. इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले.

  8. त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते.

  9. तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.

  10. त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला.

  11. याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही.

  12. परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले.

  13. जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.

  14. जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”

  15. परमेश्वराच्या मंदिराचे जे काही सेवाकार्य त्याने हाती घेतले आणि नियम व आज्ञाचे पालन करण्यामध्ये त्याने त्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि संपूर्ण अंतःकरणापासून काम केले आणि त्यामुळे तो समृद्ध झाला.

  16. त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली.

  17. तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.”

  18. कारण एज्रा याहवेहच्या नियमांचा अभ्यास करण्यास, ते पाळण्यास, व ते नियम इस्राएली लोकांना शिकविण्यासाठी समर्पित होता.

  19. कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.”

  20. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  21. परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,

  22. जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्‍दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.

  23. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  24. दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही.

  25. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.