Skip to content

Sciences बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली:

  2. वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.

  3. बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित.

  4. त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:

  5. हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.

  6. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

  7. दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.

  8. मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.

  9. आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो.

  10. पुढे आम्ही झर्‍याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.

  11. म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो.

  12. शहरातील अधिकार्‍यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो.

  13. “मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन, मातीच्या कणांइतके माझ्या आयुष्याचे दिवस असतील.

  14. “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?

  15. तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय?

  16. काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.

  17. त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.

  18. आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे त्यांचा प्रकाश देणार नाहीत. उगवता सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही.

  19. तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.

  20. गिलआदात काही औषध नाही का? तिथे कोणी वैद्य नाही का? मग माझ्या लोकांच्या जखमा तिथे बऱ्या का होत नाहीत?

  21. मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.

  22. मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.

  23. मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”

  24. याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता.