Skip to content

Sciences बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.

  2. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे.

  3. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर.

  4. नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.

  5. याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.

  6. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  7. यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.

  8. या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्‍याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.

  9. हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.

  10. कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.

  11. कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.

  12. तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती.

  13. शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती.

  14. शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह

  15. व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.

  16. इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

  17. पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.

  18. कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,

  19. यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

  20. हिव्वी, आर्की, सीनी

  21. अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले

  22. आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)

  23. वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.

  24. याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.

  25. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.