Sciences बद्दल बायबलमधील वचने: History and Chronology
History and Chronology बद्दल वचने
अहाबाच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, हस्तिदंताने मढविलेला जो राजवाडा त्याने बांधला, व ज्या शहरांचे तट त्याने बांधले ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेले नाही काय?
अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का?
याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले.
दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.