Sciences बद्दल बायबलमधील वचने: Surveying
Surveying बद्दल वचने
प्रत्येक गोत्रातून तीन पुरुषांची नेमणूक करा. आपआपल्या वतनानुसार देशाचे सर्वेक्षण करावे व त्याचे वर्णन लिहावे म्हणून मी त्यांना पाठवेन. मग त्यांनी माझ्याकडे परत यावे.
तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे.
त्या सात प्रदेशांचे वर्णन लिहिल्यावर ते तुम्ही माझ्याकडे आणावे, मग याहवेह आपल्या परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”
जेव्हा ते पुरुष प्रदेशाची मोजणी करण्यासाठी निघाले, तेव्हा यहोशुआने त्यांना सूचना दिली, “जा आणि त्या प्रदेशाचे सर्वेक्षण करा आणि त्याचे वर्णन लिहा आणि परत माझ्याकडे या, मग मी येथे शिलोहमध्ये याहवेहसमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकेन.”
तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले.
मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.
आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो.
पुढे आम्ही झर्याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती.
म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो.
शहरातील अधिकार्यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो.
मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.
मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.
मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”