Japheth
Japheth चा उल्लेख असलेली वचने
नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले.
त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले.
नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.)
हे ऐकून शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला; आपल्या खांद्यांपर्यंत तो उंच धरून ते आपल्या पित्याची नग्नता झाकली जावी म्हणून उलट्या पावली चालत जाऊन, विरुद्ध दिशेला पाहत त्यांनी तो झगा त्याच्या अंगावर टाकला.
परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.”
नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.
याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.
याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.