- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Rulers बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो, तर त्याचे सिंहासन दीर्घकाल टिकेल.
“तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:
एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,
हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.
असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.
जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल.
गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे; त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.
मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले: दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते. आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती.
मी स्वतःला म्हटले, “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करणार, कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”
मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.
मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.
तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल.
आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे.
कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?
मी हे सर्व पाहिले, सूर्याखाली होत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे माझे चित्त लावले. अशीही एक वेळ आहे, जेव्हा एखादा व्यक्ती दुसर्यावर स्वतःच्याच यातनेमुळे अधिकार चालवितो.
सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्यांकडून घडते.
मूर्खांना मोठी पदे दिले जातात, आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते.
गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात.
धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास आहे, आणि ज्या देशाचे राजपुत्र सकाळीच मेजवानी सुरू करतात.
धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात.
तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.
तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.
त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.
माझ्या लोकांना चिरडण्याचे व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.