मुख्य मजकुरावर जा

Rulers बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”

  2. निर्दयी नाहीसे होतील, आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—

  3. जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात, जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात, जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात.

  4. तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.

  5. हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.

  6. ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात.

  7. याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.

  8. “मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?

  9. म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.

  10. सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही.

  11. कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, लाकडाच्या ऐवजी कास्य, आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.

  12. ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; ते न्याय करीत नाहीत. अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.

  13. मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?

  14. राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”

  15. दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.

  16. याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:

  17. ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.

  18. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  19. “ ‘हे इस्राएलाच्या अपवित्र व दुष्ट राजपुत्रा, ज्याचा दिवस आला आहे, ज्याला दंड द्यायचा शेवटचा समय आला आहे,

  20. त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील.

  21. “ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत.

  22. तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.

  23. “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.

  24. “मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय?

  25. तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही.