मुख्य मजकुरावर जा

Rulers बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,

  2. लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.

  3. त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,

  4. गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.

  5. दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?

  6. तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे!

  7. कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे,

  8. ज्या लोकांना तू क्रोधाने मारले, सतत ठोसा मारत राहिलास, बेफाम त्वेषाने व पाषाणहृदयी आवेशाने देशांना अधीन केले.

  9. सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत; ते गाणी गात आहेत.

  10. लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, “आता तुम्हाला खाली पाडले आहे, तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.”

  11. अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे; मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी— जगामध्ये जे सर्व पुढारी होते; जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते, ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत.

  12. ते सर्व प्रतिसाद देतील, ते तुम्हाला असे म्हणतील, “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.”

  13. तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत.

  14. पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!

  15. तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.

  16. मी ढगांच्या शिखरांवर जाईन; मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”

  17. परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात, खोल खाईत लोटला गेला आहेस.

  18. जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत, ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात: “हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते.

  19. ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले ज्याने शहरे उद्ध्वस्त केली आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?”

  20. राष्ट्रांचे सर्व राजे चिरनिद्रीत अवस्थेत आहेत, प्रत्येकजण स्वतःच्या कबरेत आहे.

  21. परंतु तुला तुझ्या कबरेतून नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.

  22. तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.

  23. प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; दावीदाच्या घराण्यातील एकजण, विश्वासूपणाने त्यावर बसेल— जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.

  24. जे न्याय करण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.

  25. म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका: