मुख्य मजकुरावर जा

Rulers बद्दल बायबलमधील वचने: Character and qualifications of

77 वचने · 5 पैलू

Character and qualifications of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे.

  2. पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर.

  3. त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.

  4. “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  5. तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”

  6. याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.

  7. भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  8. न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.

  9. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  10. इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,

  11. तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’

  12. आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.

  13. म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा.

  14. भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.

  15. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.

  16. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  17. मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.

  18. तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.

  19. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील, तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या तुमचे भय बाळगून तुमचा आदर करोत.

  20. कापलेल्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, पृथ्वीला पाणी देणार्‍या सरीप्रमाणे तो होवो.

  21. त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.

  22. त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.

  23. अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.

  24. तार्शीश आणि तटवर्तीय राजे आपआपले नजराणे आणोत, शबा व सबा यांचे सर्व राजे आपले उपहार आणोत.

  25. होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.