- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Rulers बद्दल बायबलमधील वचने: Wicked
Wicked बद्दल वचने
मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.
परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील.
आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.
“जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते.
शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.
त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील.
तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.
तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.
तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल.
तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.
तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.
जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.”
इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.
या परिस्थितीवर विचार केल्यानंतर मी या प्रतिष्ठितांना व अधिकार्यांना म्हणालो, “तुम्ही स्वतःच्याच देशबांधवांकडून व्याज गोळा करीत आहात!” मग त्यांचा समाचार घेण्यासाठी मी एक मोठी सभा बोलाविली.
या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही.
मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय?
आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.
ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.
“पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत.
आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.
परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात; त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात.
त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात; इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात; धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील.
“अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात; बलवान मनुष्याच्या हातून सुटकेसाठी आरोळी करतात.
याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.