Skip to content

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने

55 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे.

  2. “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

  3. तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला.

  4. दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!”

  5. शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो!

  6. ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”

  7. कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”

  8. हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे शब्द ऐका.

  9. माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.

  10. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

  11. टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्‍यांमुळे माझी विटंबना होते.

  12. ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.

  13. तुमच्याकरिता माझी विटंबना झाली आहे, माझे मुख लज्जेने व्याप्त झाले आहे.

  14. तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.

  15. त्यांच्याकडून होणार्‍या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे; मी अत्यंत हतबल झालो आहे; मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही; मी सांत्वना देणार्‍यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.

  16. परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा; मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.

  17. हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.

  18. हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू!

  19. याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले.

  20. माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात; आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात.

  21. मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.

  22. गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात.

  23. हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.

  24. तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!

  25. तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम उंचीवर पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.