मुख्य मजकुरावर जा

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने

55 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.

  2. विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;

  3. स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत.

  4. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

  5. परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”