मुख्य मजकुरावर जा

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने

55 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.

  2. आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस.

  3. “मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, जे माझ्या लोकांचा उपहास करतात आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.

  4. म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”

  5. “माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.

  6. पण मी सांगतो की, तुम्ही बहीण किंवा भावावर रागवाल, तर तुम्ही न्यायदंडास पात्र व्हाल, जो कोणी त्यांना ‘मूर्ख’ असे म्हणेल, तर त्याला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. पण जो कोणी ‘तू मूर्ख’ असे म्हणेल तर त्याला नरकाच्या अग्नीत टाकले जाण्याची भीती आहे.

  7. शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!

  8. परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.”

  9. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत

  10. म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.”

  11. मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.

  12. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’

  13. गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”

  14. यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”

  15. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.

  16. पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  17. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”

  18. कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्‍याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”

  19. आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो;

  20. चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.

  21. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.

  22. याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.

  23. कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला.

  24. जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.

  25. वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.