मुख्य मजकुरावर जा

Prophecy बद्दल बायबलमधील वचने

120 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले.

  2. आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला.

  3. इस्राएलच्या राजाने जाऊन त्यांच्या घोड्यांना व रथांना गाठले आणि अराम्यांचे मोठे नुकसान केले.

  4. त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.”

  5. त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.

  6. मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा.

  7. तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले.

  8. पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले.

  9. जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.

  10. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  11. सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले.

  12. बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला.

  13. पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.”

  14. मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत.

  15. याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती.

  16. अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.

  17. आता तुमचे थट्टा करणे थांबवा, नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.

  18. सर्व राष्ट्रे एकत्र येतात आणि सर्व लोक एकजूट होतात. त्यांच्या कोणत्या मूर्तींनी हे भाकीत केले होते आणि भावी गोष्टी आम्हाला घोषित केल्या? त्या सत्य बोलल्या तर त्याचे साक्षीदार त्यांनी आणावे, जेणेकरून ऐकणारे म्हणतील, “हे न्याय्य आहे.”

  19. माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.

  20. जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’

  21. पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.

  22. “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”

  23. तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो.

  24. नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा.

  25. त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”