मुख्य मजकुरावर जा

Prophecy बद्दल बायबलमधील वचने: Destruction of Ben-Hadad's army

18 वचने · 47 पैलू

Destruction of Ben-Hadad's army बद्दल वचने

  1. त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”

  2. “परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले. संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ” अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?” संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.”

  3. तेव्हा अहाबाने राज्यपालांच्या हाताखाली असलेल्या दोनशे बत्तीस कनिष्ठ सैन्यांना बोलावून घेतले. मग त्याने सर्व इस्राएली लोकांना जमा केले, ते सर्व सात हजार होते.

  4. मध्यान्हाच्या वेळी, बेन-हदाद आणि त्याच्याबरोबर हात मिळविलेले बत्तीस राजे त्यांच्या तंबूंमध्ये मद्यधुंद झालेले होते.

  5. राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक प्रथम बाहेर पडले. आता बेन-हदादने टेहळणीसाठी पाठविलेल्या सैनिकांनी येऊन सांगितले, “शोमरोनातून माणसे निघाली आहेत.”

  6. तेव्हा तो म्हणाला, “जर ते शांतीने येत आहेत तर त्यांना जिवंत पकडा; जर ते युद्धासाठी येत आहेत तरीही त्यांना जिवंत पकडा.”

  7. तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले.

  8. आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला.

  9. इस्राएलच्या राजाने जाऊन त्यांच्या घोड्यांना व रथांना गाठले आणि अराम्यांचे मोठे नुकसान केले.

  10. त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.”

  11. त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.

  12. मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा.

  13. तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले.

  14. पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले.

  15. जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.

  16. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  17. सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले.

  18. बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला.