मुख्य मजकुरावर जा

Prophecy बद्दल बायबलमधील वचने: Guilt of pretending to the gift of

5 वचने · 47 पैलू

Guilt of pretending to the gift of बद्दल वचने

  1. त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”

  2. “शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली: त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले.

  3. आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”

  4. “मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका!

  5. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो!