Skip to content

Prophecy बद्दल बायबलमधील वचने

120 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संदेशाला तुच्छ मानू नका.

  2. संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.

  3. बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या.

  4. तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,

  5. त्यांच्यामध्ये असणार्‍या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्‍या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.

  6. ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.

  7. आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

  8. सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही.

  9. कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.

  10. हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

  11. प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे.

  12. परंतु, प्रिय मित्रांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेषितांनी तुम्हाला जे पूर्वी सांगितले, त्याची आठवण ठेवा.

  13. त्यांनी तुम्हाला सांगितले, “शेवटच्या दिवसात निंदा करणारे स्वतःच्या अनीतिमान वासनांच्या मागे लागतील.”

  14. ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले.

  15. जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.

  16. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.

  17. आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”

  18. “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.”

  19. या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल.

  20. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.