Skip to content

Parents बद्दल बायबलमधील वचने

156 वचने · 48 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.

  2. त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या,

  3. म्हणजे जितके दिवस पृथ्वीवर आकाश स्थित आहे, तितके तुमच्या पूर्वजांना याहवेहने देऊ केलेल्या वचनदत्त देशात तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे दिवस असतील.

  4. तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा.

  5. तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे तो आम्हास शिकवेल.”

  6. जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.”

  7. या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

  8. तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.

  9. परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

  10. माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.

  11. माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’

  12. “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’

  13. अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही,

  14. आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.

  15. तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.

  16. “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील.

  17. मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.

  18. नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”

  19. कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही.

  20. तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले.

  21. परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.

  22. त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला.

  23. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला.

  24. एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला,

  25. एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते.