Skip to content

Parents बद्दल बायबलमधील वचने

156 वचने · 48 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

  2. ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  3. जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले होते.

  4. त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली.

  5. तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.

  6. त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

  7. ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  8. परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.

  9. दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला.

  10. राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.

  11. तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”

  12. तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”

  13. सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.

  14. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  15. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

  16. तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले.

  17. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला.

  18. या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे.

  19. संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले.

  20. आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.

  21. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.

  22. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.

  23. जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.

  24. परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.

  25. त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.