Parents बद्दल बायबलमधील वचने: Curses entailed
Curses entailed बद्दल वचने
तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.
मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन.
तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.
याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”
आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.
“ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.”
तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता.