मुख्य मजकुरावर जा

Ministers बद्दल बायबलमधील वचने

201 वचने · 118 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे.

  2. मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.

  3. आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.

  4. माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.

  5. ज्यांना परमेश्वराच्या वचनातून शिक्षण मिळाले आहे, त्यांनी शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या गोष्टींचा वाटा द्यावा.

  6. या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,

  7. हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.

  8. माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे.

  9. येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल.

  10. जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  11. आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो

  12. तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता.

  13. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात.

  14. दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

  15. पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्त्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात.

  16. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.

  17. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!

  18. शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे.

  19. आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे.

  20. प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा.

  21. प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.

  22. होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्‍यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत.

  23. म्हणूनच आम्ही ज्या दिवशी तुमच्याविषयी ऐकले, तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही परमेश्वराजवळ सतत मागतो की त्यांनी तुम्हाला आत्म्याद्वारे दिले जाणारे सर्व ज्ञान व समज यांच्याद्वारे त्यांच्या इच्छेच्या ज्ञानाने भरावे;

  24. अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.”

  25. जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे.