Ministers बद्दल बायबलमधील वचने: Without deceitfulness
Without deceitfulness बद्दल वचने
आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.
आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.
जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे.
तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत.