Ministers बद्दल बायबलमधील वचने: Love them
Love them बद्दल वचने
तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.
तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात.