मुख्य मजकुरावर जा

Ministers बद्दल बायबलमधील वचने

201 वचने · 118 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.

  2. जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी

  3. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.

  4. परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील.

  5. जरी तुम्ही थोडेफार आम्हाला ओळखता आणि पुढे तुम्हाला पूर्णपणे कळून येईल की प्रभू येशूंच्या दिवशी जसा तुम्हाला आमचा अभिमान आहे, तसाच आम्ही पण तुमच्याविषयी अभिमान बाळगू.

  6. ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही.

  7. तीमथ्य, सीला व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे.

  8. मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल.

  9. आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.

  10. आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे.

  11. नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.

  12. आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे.

  13. आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.

  14. आम्ही स्वतःविषयी प्रचार करीत नाही, तर ख्रिस्त येशू हेच प्रभू आणि आम्ही येशूंसाठी तुमचे दास आहोत.

  15. तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे.

  16. आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही.

  17. छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही.

  18. आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.

  19. आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये.

  20. आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो.

  21. व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत.

  22. मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.

  23. तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.

  24. हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही.

  25. आता मी तिसर्‍यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.