Skip to content

Man बद्दल बायबलमधील वचने

106 वचने · 114 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.

  2. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.

  3. पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे;

  4. जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.

  5. जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,

  6. तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?

  7. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात; कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात.

  8. त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’

  9. मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.

  10. माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?

  11. “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?

  12. तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?

  13. दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,

  14. तुम्ही मला त्वचा व मांस दिले, आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?

  15. “मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?

  16. जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?

  17. “तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का?

  18. तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का?

  19. मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?

  20. जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

  21. मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

  22. “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’

  23. तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’

  24. “तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना मला उत्तर द्यायला आवडेल.

  25. वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा; तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा.