Man बद्दल बायबलमधील वचने: Insignificance of
Insignificance of बद्दल वचने
जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,
तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?
“मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का? अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?
जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद? तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?
“तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का?
तुझी दुष्टता पुष्कळ नाही का? तुझे अपराध अनंत नाही का?
मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?
जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”
“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’
तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’
“तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना मला उत्तर द्यायला आवडेल.
वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा; तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा.
जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार? तुझी पापे जरी पुष्कळ आहेत, तरी त्याचे त्यांना काय?
जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?
तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर, आणि तुझे न्यायीपण इतर लोकांवर परिणाम करू शकतात.
“तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे,
यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील?
जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,
मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?
कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.