Skip to content

Man बद्दल बायबलमधील वचने: Created

8 वचने · 114 पैलू

Created बद्दल वचने

  1. मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्‍या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.”

  2. याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.

  3. ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.

  4. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.

  5. मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.

  6. माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?

  7. “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?

  8. तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा, पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?