मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.

  2. “पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत.

  3. आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.

  4. त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले.

  5. त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले.

  6. त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला,

  7. त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.

  8. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.

  9. त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.

  10. याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही.

  11. याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.

  12. उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले, आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.

  13. त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली, त्यामुळे ते पाशात अडकले.

  14. त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.

  15. निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.

  16. आपल्याच कर्मानी ते भ्रष्ट झाले; आणि त्यांचे कृत्य व्यभिचारी ठरले.

  17. आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली.

  18. त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.

  19. त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले.

  20. पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.

  21. त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत.

  22. त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही.

  23. त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही.

  24. मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.

  25. परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत, त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत.