- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Idolatry बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली.
त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला.
म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले,
परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले.
यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले.
जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराेबाेअमास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले.
इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही,
जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.
त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.”
याहवेहच्या मंदिराच्या दोन अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या.
त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.
त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.
त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या.
त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.
त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.
म्हणून तुम्ही त्यांना शत्रूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांचा छळ केला. पण जेव्हा त्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्यांनी तुमचा धावा केला. तो तुम्ही स्वर्गातून ऐकला. त्यांच्यावर महान कृपा करून, शत्रूपासून मुक्त करणारे रक्षक त्यांच्याकडे पाठविले.
“पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!
“त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.
अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.
पण तुमच्या महान दयेमुळे तुम्ही त्यांचा सर्वनाश केला नाही व त्यांचा त्याग केला नाही, कारण तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात.
“म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली.
जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो.
आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.