मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, परंतु ते बघू शकत नाहीत.

  2. त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही, ना त्यांना श्वास घेता येतो.

  3. जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील, आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील.

  4. “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; ज्यांची तुम्ही निवड केली आहे त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल.

  5. तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.

  6. पराक्रमी मनुष्य चकमकीसारखा होईल, आणि त्याचे काम ठिणगी असे होईल; दोघेही एकत्र जळतील, ती आग विझविणारे कोणीही नसेल.”

  7. याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.

  8. त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.

  9. सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे; त्यांच्याच हस्तकृतींनी, जे त्यांच्या बोटांनी बनविले आहे, त्याला ते नमन करतात.

  10. म्हणून या लोकांचे पतन केले जाईल आणि सर्वजण नमविले जातील— त्यांना क्षमा करू नका.

  11. याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!

  12. उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  13. गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—

  14. लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,

  15. उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,

  16. प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,

  17. तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.

  18. मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  19. सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.

  20. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.

  21. त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.

  22. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.

  23. मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?

  24. त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील.

  25. ते वेद्यांकडे, त्यांच्या हस्तकृतींकडे पाहणार नाहीत, आणि अशेरा स्तंभांसाठी आणि त्यांच्या बोटांनी तयार केलेल्या धूप वेद्यांकडे आदराने पाहणार नाहीत.